Pune : भावडी येथील 10 खडी क्रशरवर कारवाई

हवेली महसूल विभागाची कारवाई; नियमित कारवाई सुरू राहणार
pune
खडी क्रशरवर कारवाईPudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील भावडी येथील अनियमित असलेल्या दहा खडी क्रशरवर लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते व पथकाने कारवाई केली. त्यामुळे बेकायदा खडी क्रशरमाफियांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पुढेही नियमित सुरू राहणार असून, या भागातील सर्व खडी क्रशरची तपासणी करणार असल्याचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.

लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यलयांतर्गत भावडी, वाघोली, लोणी कंद येथील बहुतांश खडी क्रशर बेकायदा आहेत. शासनाची परवानगी न घेता तसेच नियमांचे उल्लंघन करून खडी क्रशर चालवत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही नागरिक आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्राप्त झाल्याने या भागात खडी क्रशरची तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक तपासणीत दहा खडी क्रशर बेकायदा आढळल्याने कारवाई करण्यात आली. या भागातील क्रशरची ईसी (इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट) या भागात सत्तर बेकायदा खाणी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत व प्रतिदिन 15 ते 20 हजार ब—ास दगडाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे.

हे खडी क्रशरमाफिया शासनाचे शासकीय स्वामित्व कोट्यवधी रुपये बुडवत आहेत. धुळीमुळे मानवी जीवनास त्रास होतो. शासनाचे नियम पाळले जात नाहीत. खाणीच्या उत्खननाचे मोजमाप पारदर्शी केले जात नाही. मोजणी ड्रोनच्या साहाय्याने केली पाहिजे. वन विभागाने देखील तपासणी करणे आवश्यक आहे, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. त्यानुसार अप्पर लोणी काळभोरच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी पथकासह भावडी येथे कारवाई केली. या वेळी फक्त भावडीमध्ये 10 खडी क्रशर बेकायदा आढळून आले. या खडी क्रशरवर कारवाई करून ते सर्व सील केले आहेत. तक्रारदाराच्या अर्जानुसार अजून वाघोली, लोणी कंद, फुलगाव येथे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारे, विनापरवाना क्रशर चालवणारे अशा सर्व बेकायदा खडी क्रशरवर कारवाई करणार असल्याचे लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news