धावत्या रेल्वेतून चढ-उतार केल्यास कारवाई व्हावी; नोकरदारवर्गाची रेल्वेत दादागिरी वाढली

जागा अडवून ठेवण्याचे प्रकार वाढीस
Kurkumbh News
धावत्या रेल्वेतून चढ-उतार केल्यास कारवाई व्हावी; नोकरदारवर्गाची रेल्वेत दादागिरी वाढली Pudhari
Published on
Updated on

कुरकुंभ: धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडू नका, असे रेल्वे स्थानकावर नेहमी ऐकायला मिळते. असे असले तरी धावत्या रेल्वेतून रेल्वे स्थानकावर उतरणे ही काही दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गाची सवय झालेली आहे. मात्र, या गंभीर प्रकारामुळे सर्वसामान्यांच्या जिवाला धोका होत आहे. असे कृत्य करणाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

दौंड तालुक्यातून हजारो प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. यामध्ये तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशी, व्यापारी, विद्यार्थी यासह विशेषत: दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार प्रवाशांचा समावेश असतो. परिणामी, पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या डेमू, शटल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट अशा सर्व गाड्यांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

बहुतांश प्रवाशी दाराजवळ उभे असतात. अपेक्षित रेल्वे स्थानक येण्यापूर्वी याच नोकरदारवर्गाची धावत्या रेल्वेतून उतरण्याची तसेच किती नंबर फलाटवर गाडी घेतली हे पाहण्याची हमखास धडपड सुरू असते.

यादरम्यान ताटकळत उभे असलेल्या प्रवाशांना मागे सरका, असे म्हणत दमदाटी केली जाते. वास्तविक पाहता धावत्या रेल्वेतून पडून अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. काहींना कायमचे अंपगत्व आले आहे. तरीही याचा काही प्रवाशांकडून अद्याप बोध घेतला जात नाही.

दरम्यान, प्रवासात काही नोकरदार प्रवाशांची दहशत वाढत आहे. हा वर्ग मित्रमंडळींना बाकड्यावर जागा मिळावी म्हणून अनेक बाकडे अडवून ठेवतात. त्याठिकाणी दुसरे कोणालाही बसू दिले जात नाही. रेल्वे तिकीट व पास असला तरीही संबंधित प्रवाशाला हाकलून लावले जाते.

ब्रिजजवळ उतरण्याची धडपड

रेल्वे स्थानकातील ब्रिजजवळ धावत्या रेल्वेतून उतरण्याचा या वर्गाचा हट्ट असतो. पुण्यात शिक्षणांसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या मुला-मुलींची संख्या लक्षणीय असून, तेदेखील अनुकरण करून धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार कशासाठी याचे कारणही समोर आले आहे. ब्रिजजवळ उतरले नाही, तर लांबपर्यंत चालावे लागते. ब्रिजवर गर्दी वाढते. कामाला जाण्यास उशीर होतो, असे प्रवाशांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news