दंड वसूल करून, पावत्या करून आम्ही गाड्या सोडतो. पुन्हा गाड्या आढळल्यास परत कारवाई करतो. एकाच ठिकाणी दोनवेळा कारवाई करणे शक्य होत नाही. दंडाची रक्कम वाढवावी लागेल किंवा गुन्हे दाखल करावे लागतील. पॉलिसी पद्धतीने कारवाई सुरू आहे. दररोज कारवाई शक्य नाही. बाकीच्या 10 ठिकाणच्या तक्रारी आलेल्या असतात. जप्त केलेले साहित्य ठेवायला जागा नाही. साहित्य जप्त करायचे किती? त्याला पण मर्यादा आहे.– अमोल पवार, सहाय्यक आयुक्त,कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय