

पुणे: विमानगरमधील एका आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम करणार्या तरुणीच्या खुनप्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजिया (वय 27) याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी (दि. 13) न्यायालयात हजर करण्यात आले.
या वेळी आरोपीच्या वतीने अॅड. सचिन कुंभार, अॅड. संजय खेडकर व अॅड. किरण धरपाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने बचाव पक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
शुभदा आणि कृष्णा हे दोघे एका कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. मंगळवारी (दि. 6) शुभदा कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. कनोजिया याने तिला पार्किंगमध्ये गाठले.
तरुणीच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाला. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.