मुळशीत अर्धवट रस्त्यामुळे अपघात वाढले; दुचाकीस्वार असुरक्षित

मुळशीत अर्धवट रस्त्यामुळे अपघात वाढले; दुचाकीस्वार असुरक्षित

पौड : पुढारी वृत्तसेवा : पुणे ते दिघी बंदर महामार्गावर ज्या ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे, त्या ठिकाणी अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचे जास्त प्रमाण आहे. धनवेवाडी ते मालेदरम्यान सरळ रस्ता असल्याने वर्दळीच्या ठिकाणी रम्बलर टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
पुणे ते दिघी बंदर महामार्गावर पौड, कळमशेत, दिसली या ठिकाणी नुकत्याच झालेल्या काही अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर पिरंगुट, कासार आंबोली आणि सुतारवाडी येथील ओढ्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक वेगाने आलेली वाहने या ठिकाणी आदळून अपघात होत आहेत.

मुळशी तालुक्यातून कोकणात जाण्यासाठी पर्यटक या मार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. भरधाव वाहन चालविणारे तसेच नव्याने या भागात आलेल्या वाहनचालकांचे या भागात अपघात होत आहेत. या महामार्गावर सध्या जडवाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तसेच लांबपल्ल्याच्या एसटी व पीएमपीएमएलच्या बसची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळेही होणार्‍या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

धोकादायक पौड घाट

पुणे ते दिघी बंदर महामार्गावर पौड घाट लागतो. मात्र, सुतारवाडी ते धनवेवाडी या 2 किलोमीटर अंतर असलेल्या घाटात अनेक वेडीवाकडी वळणे आहेत. तसेच घाटात माथ्यावर रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने हा घाट धोकादायक बनला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news