मोबाईलवर बोलताना तरुणीला डंपरची धडक ; तरुणीचा जागीच मृत्यू

डंपरचालक तेथून पसार झाला
accident news
डंपरची धडकFile Photo
Published on
Updated on

भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना कर्वे रस्त्यावर परिसरात बुधवारी (दि. 9) सकाळी घडली. तरुणी मोबाईलवर बोलत दुभाजक ओलांडत होती, त्या वेळी भरधाव डंपरने तिला धडक दिली. आरती सुरेश मनवाने (वय 23, रा. एरंडे हॉस्टेल, भेलकेनगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

आरती मूळची अमरावतीची आहे. ती शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. अपघाताची माहिती तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. तिचे कुटुंबीय पुण्याकडे रवाना झाले आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सकीम अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे यांनी दिली.

आरती बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. कर्वे रस्त्यावरील दामोदर व्हिला सोसायटीकडून ती कोथरूडमधील बसस्थानककडे जात होती. ती दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत होती. त्या वेळी ती मोबाईलवर बोलत होती. समोरून भरधाव वेगाने आलेला डंपर तिच्या नजरेस पडला नाही. डंपरच्या चाकाखाली ती चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला.

वाहनचालकांनी डंपरचा पाठलाग करून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालक तेथून पसार झाला. यानंतर पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. अपघाताची माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे आणि पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. परंतु, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

रस्ता ओलांडतांना मोबाईलचा वापर जिवावर

शहर, परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी शिक्षणासाठी स्थायिक झाले आहेत. वाहन चालविताना अनेक जण मोबाईलवर संभाषण करतात. अनेक जण मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात. मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणे, तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्याने गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघात घडतात. कर्वे रस्त्यावर बुधवारी सकाळी डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडत होती. दुभाजकावर चढून ती रस्ता ओलांडत असताना तिला डंपरने धडक दिली.

कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा

कर्वे रस्ता गजबजलेला रस्ता आहे. दिवसा, तसेच रात्रीही या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात 19 ऑगस्ट रोजी सायकलस्वार निवृत्त कृषी अधिकारी सुनील भास्करराव देशमुख (वय 60, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. रससाळा चौकात जून महिन्यात जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी (वय 67, रा. कोथरूड) यांचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकाने सहा वाहनांना धडक दिल्यची घटना घडली होती. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news