“काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून आलेल्या तरुणाला ‘ब्रेन स्ट्रोक

A young man who came to see the movie 'Kashmir Files' had a brain stroke
A young man who came to see the movie 'Kashmir Files' had a brain stroke
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'काश्मीर फाईल्स' चित्रपट पाहून आल्यानंतर "ब्रेन स्ट्रोक" आलेल्या कटर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी (दि. २७) चिंचवड येथे घडली.

अभिजित शशिकांत शिंदे (३८, रा. लिंकरोड, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,अभिजित हा कट्टरहिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा होता.

लहानपणापासूनच त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव होता. शिवसेनेचे विचार जनसामान्यात पोहचवण्यासाठी त्याने 'लोकप्रतिनिधींसोबत यापूर्वी काम केले आहे.

मात्र, अलीकडे काही दिवसांपासून अभिजित भाजपच्या पदाधिकार्‍यांसोबत राहत होता.दरम्यान, २१ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास अभिजित त्याच्या मित्रांसोबत काश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्यासाठी गेला.

चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यानंतर तो कोणाशीही न बोलता थेट खोलीत झोपायला  गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news