

दौंड: दौंड शहरात सतत तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे दौंड शहरातील एका जुन्या बांधकामाची भिंत पावसामुळे कोसळली होती. यामध्ये ताराबाई विश्वचंद आहेर (वय 75) या दुकानात उभ्या असताना त्यांच्या अंगावर ही भिंत पडली. या घटनेमध्ये त्या जखमी झाल्या होत्या जखमी अवस्थेमध्ये त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते, परंतु सोमवारी( दि.26) त्यांचा मृत्यू झाला. इमारत शिवाजी चौक येथील असून पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. (Latest Pune News)
अशी माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी काही वेळापूर्वी शासकीय पंचनामे करता कर्मचारी गेले होते. शहरात अनेक ठिकाणी अशा जीर्ण झालेल्या इमारती असून त्या सुद्धा कोसळण्याचे शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये राहू नये असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.