अबब! एका फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी

पुण्यातील हडपसरच्या सोसायटीतील घटना
Pune Cat News
अबब! एका फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरीPudhari
Published on
Updated on

Pune News: हडपसर , मांजरी येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण केले आहे.

सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांचा सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मांजरांचे मोठ्या आवाजात ओरडणे, तसेच त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो. त्यामुळे स्थनिकांनी महापालिका आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

रहिवाशांनी 2020 मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news