Saswad Accident: पुण्यातील वडगाव बुद्रुक येथून खंडोबाचे देवदर्शनासाठी जाताना सासवड-कोंढवा महामार्गावर सासवडजवळ रिक्षा पुलावरून खाली कोसळली. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी 11 वाजेच्या सुमारास सासवड हद्दीत घडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली तर रिक्षाचालकासह तीन जण यातून बचावले आहेत.
रिक्षाचालक अमित डबेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पुण्यातील वडगाव बुद्रुक येथून जेजुरीला खंडोबाचे देवदर्शन करण्यासाठी उमेश चव्हाण, अमित डबेरा, प्रमिला चव्हाण, जया चव्हाण आणि शारदा डबेरा (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) हे रिक्षाने निघाले होती.
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेली रिक्षा ही सासवड येथील शितोळे गॅरेजनजीक रस्त्याच्या कडेला पुलावरून पडली. जखमींना तातडीने खासगी सासवड येथील रुग्णालयात करण्यात आले आहे.