Pune : पालिकेच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड

सणापूर्वी मिळणार बोनस व सानुग्रह अनुदान
Pune municiple corporation
पुणे महापालिका pudhari
Published on
Updated on

महापालिकेतील सुमारे 18 हजार कर्मचारी आणि अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी 8.33 टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त व लेखा विभागाने परिपत्रक काढल्याने कर्मचारी व अधिकार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस दिला जातो. यावर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी 125 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात 18 ऑक्टोबरपर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले असून, दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

2023-24 च्या मूळ वेतन, महागाईभत्ता यावर 8.33 टक्के आणि 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान उपस्थितीच्या प्रमाणात दिले जाणार आहे. गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान 180 दिवस असणे आवश्यक आहे, अशांना ही रक्कम दिली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news