घासातला घास खाल्ला खरा..! पण त्याने आपला गुण दाखवलाच; मुलीला दिल्लीला पळवून नेत वारंवार अत्याचार

परप्रांतीय युवकाने अल्पवयीन मुलीला दिल्लीला पळवून वारंवार केला बलात्कार
Pune News
घासातला घास खाल्ला खरा..! पण त्याने आपला गुण दाखवलाच; मुलीला दिल्लीला पळवून नेत वारंवार अत्याचार file photo
Published on
Updated on

खेड: आठ वर्षे ज्या घरात आधार मिळाला..ज्या कुटुंबाने घासातला घास भरवला..त्याच कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून त्या नराधमाने आपले गुण दाखवल्याचा किळसवाणा प्रकार राजगुरूनगर लगतच्या एका गावात घडला आहे. कामाला ठेवलेल्या परप्रांतीय अल्पसंख्याक युवकाने ज्या ठिकाणी काम केले. त्याच परिवारातील १७ वर्षीय मुलीला पळवून नेवून तिच्यावर दिल्ली मध्ये वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

२२ फेब्रुवारीला ही मुलगी गायब झाली होती, बरोबरच कामाला असलेला युवकही गायब झाला होता.मुलगी गायब झाल्याची आणि त्या युवकाची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबाने खेड पोलिसात केली. खेड पोलिसांनी पालकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली.त्यानंतर वेगाने चक्र फिरवुन या युवकाचा तत्परतेने मागोवा घेतला.

त्यानंतर दिल्लीतील एका ठिकाणाहून युवक व मुलीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राजे यांनी दिली.बलात्कार करून या मुलीबरोबर युवकाने विवाहची देखील तयारी केली होती. पोलिसांच्या तत्परतेने पुढील अनर्थ टळला असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात माहिती अशी कि, राजगुरुनगरच्या जवळील एका वाडी मध्ये आरोपी युवक रिजवान कमालूद्दीन आलम हा ( मुळ रा. - बिहार ) त्या परिवाराकडे कामाला होता. त्याचे राहणे, खाणे व झोपणे याच परिवाराकडे होते. जवळपास ८ वर्षे हा युवक परिवारात वावरत होता. सहवास वाढल्याने त्याने विश्वास संपादन केला. त्यातून त्याने हे कृत्य केले.

तो काम करत असलेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीला दिल्ली मध्ये नेले व तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. मात्र खेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी स्नेहल राजे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीचे लोकेशन शोधून काढले. त्यानुसार दिल्ली येथे जाऊन शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर आरोपी व मुलीला एका ठिकाणाहून ताब्यात घेतले.

सदर विषय हा अत्यंत नाजूक असल्याने ह्या विषयाची कुठेही वाच्यता न करता तपास अधिकारी स्नेहल राजे व पोलीस शिपायी प्रवीण आढारी यांनी आपली कामगिरी पार पाडली.आरोपी रिजवान कमालुद्दीन आलम याच्या विरोधात बी एन एस १३७ (२), ६४,तसेच कलम ४,६,८ पोक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. १) हजर केल्यानंतर २ दिवसांची कोठडी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news