

Accident News: कल्याण-अहिल्यानगर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून महामार्गांवरील उदापूर (ता. जुन्नर) जवळील ढमालेमळा शिवाराजवळील हॉटेल निमंत्रणसमोर कार आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवारी (दि. ६) रात्री १०.३० दरम्यान ही घटना घडली.
ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी व कल्याण दिशेकडून ओतूरच्या दिशेने जाणारी कार यांची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील प्रेम घोडेकर (रा. ओतूर मोनिका चौक, ता. जुन्नर) हे अपघातात ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये हे तातडीने हजर झाले होते. या अपघाताचा तपास ओतूर पोलीस करत आहे.