पालिका करणार प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर | पुढारी

पालिका करणार प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

शहरी भागात तयार होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचा पुनर्वापर उद्यानविषयक कामे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, महापालिकेची बांधकामे अशा ठिकाणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी निर्देशदेखील दिले आहेत.

पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. शहरी भागात तयार होणारे सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर नदी, तलावामध्ये सोडले जाते. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याच्या वापराव्यतिरिक्त पुनर्वापर केल्यास पिण्याच्या पाण्याची बचत होऊन तितक्याच क्षमतेचे पाणी नागरिकांना उपलब्ध होईल.

BCCI शी पंगा घेणं गांगुलीला पडले होते महागात!, १६ वर्षांपूर्वी…

स्वच्छ भारत, माझी वसुंधरा अभियानाच्या आढावा बैठकीमध्ये आयुक्त पाटील यांनी संबंधित विभागांना पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे. यानुसार उद्यानविषयक कामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात यावे. मैलाशुद्धीकरण केंद्राजवळील उद्यानांना या पाण्याचा पुरवठा नलिकेद्वारे तर इतर ठिकाणी टँकरद्वारे करण्यात यावा. उद्यानविषयक कामांसाठी मोशी कचरा डेपोमध्ये तयार होणारे खत वापरावे.

आमचा अंत बघु नका एसटी संपकऱ्यांनी अट्टाहास सोडावा : अजित पवार

सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सींनी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जलनि:सारण विभागामार्फत ड्रेनेजलाइन स्वच्छतेसाठी रिसायकलिंग, जेटिंग मशीनचा वापर करण्यात येतो. या ठिकाणीही प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे ठेकेदारास बंधनकारक करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

‘ओमायक्रॉन’च्या धास्तीने दुसऱ्या दिवशीही शेअर बाजार कोसळला!

विविध बांधकामांसाठी नजीकच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बंधनकारक करणेबाबत स्थापत्य, प्रकल्प, बीआरटीएस विभागाला आदेश दिले आहेत.

अग्निशमन वाहनांसाठी नजीकच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. ठेकेदारांना कामांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर बंधनकारक करण्याबाबत संबंधित विभागांनी या ठेकेदारांसमवेत सामंजस्य करार करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.

Back to top button