.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत संभाजी खमधरे, सतीश जाधव यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांच्या पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथील 85 कोटी रुपयांच्या मालमत्ता बुधवारी (दि. 16) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या.
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहारप्रकरणी पीएमलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागानेही कारवाई केली होती. बेकायदा आर्थिक व्यवहारप्रकरणी (मनी लॉड्रिंग) बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते. ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. बांदल यांच्या बंँक खात्यांची माहितीही ईडीच्या अधिकार्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. दरम्यान, यापूर्वी बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमेदवारी रद्द केली होती.