पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत (पीएमएफएमई) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 442 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून सुमारे 85 कोटी 64 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक झाली असून, संबंधितांनी 60 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज रक्कम बँकांनी मंजूर केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळाली. दुग्धजन्य पदार्थ आणि गूळ उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.