धनगरवाडी परितवाडी हद्दीतून ३ वर्षीय चिमुरडी रात्रीपासून बेपत्ता; पोलीस तपास सुरू

धनगरवाडी परितवाडी हद्दीतून ३ वर्षीय चिमुरडी रात्रीपासून बेपत्ता; पोलीस तपास सुरू

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव -ओझर रस्त्यावर धनगरवाडी परितवाडी हद्दीतील संदीप विश्वासराव यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या गणेश भिलाला यांची तीन वर्षाची मुलगी रोशनी रविवारी (दि. १६) मध्यरात्री दीड वाजण्याचा सुमारास झोपडीतून गायब झाली. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, जुन्नरचे पोलीस निरीक्षण किरण अवचट तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वन विभाग देखील करत आहे बिबट्याच्या दिशेने तपास

दरम्यान बिबट्याने मुलीला पळवून नेले असेल काय? याबाबतचा तपास वन विभाग करीत असून आजूबाजूच्या उसाच्या पिकाची पहाणी केली आहे, तसेच त्या मुलीच्या कुटुंबातील कोणी घातपात केला असेल काय याबाबत पोलीस तपास करीत असून त्यांच्या कुटुंबातील तिघांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, पोलीस पाटील अजय राऊत, धालेवाडीचे पोलीस पाटील धनंजय राऊत व इतर स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news