आळंदीत थोडक्यात टळली पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेची पुनरावृत्ती

आळंदीत थोडक्यात टळली पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेची पुनरावृत्ती

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहरा लगत असलेल्या वडगाव घेनंद (ता.खेड) गावच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने चारचाकी गाडी चालवत महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला यात महिला बालबाल बचावली असून या प्रकरणी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी वडगाव घेनंद येथील नाजुका रणजित थोरात यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी (दि. १५) घडली आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यात नुकतेच ताजे प्रकरण असलेल्या पोर्शे कार अपघात घटनेची ही पुनरावृत्तीच होती ती थोडक्यात टळली अशी चर्चा नागरिक करत आहेत.

महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव घेनंदमधील गणेश नगरमधे फिर्यादी नाजुका थोरात राहत आहेत. थोरात यांच्यासोबत अल्पवयीन मुलाचे पूर्वी असलेल्या भांडणाच्या रागातून हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील चारचाकी कार (एमएच १४, एचडी ५७४९) जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, थोरात बाजूला झाल्याने वाचल्या. थोडीशी दुखापत थोरात यांना झाली. हातात लाकडी दांडकेही होते. भांडणाचा प्रकार सुरू असताना सदर अल्पवयीन त्यांच्याकडील कार शंभर मीटर अंतर मागे नेली आणि पुन्हा त्याच वेगाने कार पुढे चालवून घटनास्थळी उपस्थित अन्य लोकांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यामधे एक वृद्ध व्यक्ती होती. यावेळी भरधाव वेगात येणारी कार पाहून लोक बाजूला झाले, अन्यथा त्यांचीही काही खैर नव्हती.

कार पुढे घेऊन गेल्यानंतर या मुलाने कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला आणि थोरात यांच्याकडे पाहून शिवीगाळ करत होता. दरम्यान, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलिस स्टेशनमध्येव सदर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलाला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात
करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news