नसरापूर रस्ते कामाला मुहूर्त मिळेना; अधिकार्‍यांचा वेळकाढूपणा

नसरापूर रस्ते कामाला मुहूर्त मिळेना; अधिकार्‍यांचा वेळकाढूपणा

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : नसरापूर – वेल्हा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. तारीख पे तारीख देणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाला व ठेकेदाराला या कामाची सुरुवात करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.

नसरापूर – वेल्हा रस्ता कामाचे भूमिपूजन 23 फेब्रुवारी रोजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, काम सुरू झाले नाही. यासाठी महावितरणच्या पोलचे कारण सांगितले जात आहे. याबाबत पदाधिका-यांनी विचारले असता संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्याप काम सुरू झालेले नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी संजय वागज व प्रशांत गाडे हे केवळ पुढील तारीख देत आहेत. याबाबत वागज व गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

संबंधित विभाग व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली असून रस्त्याच्या कडेला असणारे विद्युत खांब बाजूला घेण्यात येणार आहेत. खांब हलविण्याचे व रस्त्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करावे,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

– संग्राम थोपटे, आमदार

रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांकडे सतत पाठपुरावा सुरू आहे, परंतु अधिकार्‍यांत उदासीनता दिसून येत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी आमची भूमिका आहे.

– सपना ज्ञानेश्वर झोरे, सरपंच, नसरापूर

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news