उजनीत अवैध वाळूउपसा करणार्‍या 8 बोटी उद्ध्वस्त; वाळूमाफियांचे धाबे दणाणले

पुणे, सोलापूर प्रशासनाची कारवाई
Indapur
उजनीत अवैध वाळूउपसा करणार्‍या 8 बोटी उद्ध्वस्त; वाळूमाफियांचे धाबे दणाणले Pudhari
Published on
Updated on

इंदापूर: उजनी धरणातून होणार्‍या अवैध वाळूउपसा याविरोधात इंदापूर तहसील आणि पोलिस प्रशासन पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुणे आणि सोलापूर प्रशासनाच्या वतीने संयुक्तकरीत्या गुरुवारी (दि. 13) शिरसोडी, कालठण, कांदलगाव परिसरात वाळूउपसा करणार्‍या 3 बोटी जप्त करून 8 बोटी जिलेटिनच्या स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, सोलापूरचे सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाळूमाफियांच्या विरोधात सातत्याने जोरदार कारवाई करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील शिरसोडी, कालठण, पडस्थळ या भागात कारवाई करण्यात आली. या वेळी वाळूमाफियांच्या 11 बोटी पकडल्या. यातील 8 बोटींना जिलेटिनच्या स्फोटात उडवून देण्यात आले, तर 3 बोटी जप्त करण्यात आल्या. या कारवाई प्रसंगी निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडलाधिकारी श्याम जोडगे, औदुंबर शिंदे, राहुल पारेकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

अवैधरीत्या वाळूउपसा करणार्‍या बोटींवर जिलेटिनच्या साह्याने स्फोट करत, तर काही पाण्यात बुडवून नष्ट करण्यात येत आहेत. मात्र, या बोटींचे चालक, मालक शोधून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news