मतदानाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त; निवडणूक अधिकार्‍यांकडून सुरक्षेचा आढावा

मतदानाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त; निवडणूक अधिकार्‍यांकडून सुरक्षेचा आढावा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 13) होणार्या मतदानाकरिता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच, प्रत्यक्ष मतदाना वेळी आवश्यक पोलिस यंत्रणेच्या आराखड्याचा आढावा गुरुवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रायगड पोलिस आणि नवी मुंबई पोलिस कार्यालय क्षेत्रात येणार्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी बैठक आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालय येथे झाली.

या वेळी निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक पोलिस निरीक्षक विवेकानंद सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, रायगड ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, सहायक सचिन मस्के, अभिजित जगताप, मनीषा तेलभाते आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यांतर्गत सुरक्षाविषयक नियोजन आराखड्याबाबत रायगड ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती दिली. कर्जत, नेरळ, खोपोली, कळंब, खालापूर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर तसेच भरारी पथके, तपासणी नाके, स्थिर सर्वेक्षण पथक, ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात जप्त करण्यात आलेली रक्कम, शस्त्रे, अवैध मद्यसाठा याबाबतची माहिती देण्यात आली. गुंडांवर केलेली कारवाई तसेच, निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल झालेले विविध गुन्हे याबाबत माहिती देण्यात आली.

भरारी पथकाची नियुक्ती

नवी मुंबई पोलिस प्रशासनाच्या सुरक्षाविषयक नियोजन आराखड्याबाबत नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती दिली. पनवेल शहर, न्हावाशेवा, रबाळे, पनवेल ग्रामीण, रबाळे एमआयडीसी, खांडेश्वर, कोपरखैरणे, कामोठे, वाशी, कळंबोली, तळोजा, खारघर, तुर्भे, सानपाडा, नेरूळ, उरण, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भरारी पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news