LokSabha Elections : राज्यात मोदींना मते मागण्याचा अधिकार नाही : नाना पटोले  | पुढारी

LokSabha Elections : राज्यात मोदींना मते मागण्याचा अधिकार नाही : नाना पटोले 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणारे, राज्यातील शेतकर्‍यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात मते मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी पुण्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. काँग्रेसचा (इंडिया आघाडी) जाहीरनामा आणि दिलेल्या गॅरंटीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने भाजप अस्वस्थ झाले आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहेत. ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु, ते हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. चीन आपला भूभाग बळकावत आहे, त्यावर ते काही बोलत नाहीत.

काय म्हणाले पटोले?

  • सर्वात खोटारडे पंतप्रधान म्हणून मोदी यांचा उल्लेख करावा लागेल.
  • महाराष्ट्राचे सर्वांत जास्त नुकसान हे भाजपच्या नेत्यांनी केले.
  • भाजपमध्ये नेते निर्माण होत नाहीत, दबावतंत्राचा वापर करून त्यांनी आमचे नेते फोडले.
  • भाजपच्या नेत्यांनी घरात भांडण लावण्याचे काम करून राज्यात असंस्कृत राजकीय व्यवस्था निर्माण केली

Back to top button