Crime News : वडगाव आनंदमध्ये भर दिवसा घरफोडी | पुढारी

Crime News : वडगाव आनंदमध्ये भर दिवसा घरफोडी

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : वडगाव आनंद (ता. जुन्नर) परिसरातील मुकाईमळा व पादीरवाडी रस्त्यालगतच्या गाढवलोळी येथील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 12 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा हा धुमाकूळ बुधवारी (दि. 24) दुपारनंतर सुरू होता. या प्रकरणी मारुती भिकाजी गडगे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडीची पहिली घटना मुकाईमळा येथे घडली. मारुती गडगे यांच्या बंद घरात घुसून चोरट्यांनी 2 लाख 85 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा 6 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तर दुसर्‍या घटनेत पादीरवाडी रस्त्यालगतच्या गाढवलोळी येथील गोपीनाथ शेवंता शिंदे यांच्या घरातून चोरट्यांनी 72 हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा 3 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. बंद घरांतील चोर्‍यांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवून काळजी घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button