

सतत उन्हात फिरणार्यांनी किंवा बांधकाम, खोदकमाच्या साईटवर काम करणारांनी दर तासाला काम थांबवून पाणी पिणे गरजेचे आहे. एरवी दिवसाला 4 लिटर पाणी पुरेसे असते. पण उन्हाळ्यात 4 ते 6 लिटर पाणी प्यायला हवे. सतत उन्हात फिरत असला तर हीट क्रॅप येतात. म्हणजे पायात गोळे येणे अशी लक्षणे दिसतात. तेव्हा साधे पाणी, इलेक्ट्रॉलयुक्त पाणी प्या. तेही घेऊन फरक नाही पडला तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे. लोक ही लक्षणे दिसत असूनही अंगावर काढतात. त्याचे रूपांतर हीट स्ट्रोकमध्ये होऊ शकते. सध्या अशी लक्षणे वाढलेले रुग्ण शहरात मोठ्या संख्येने येत आहेत.-डॉ. अमित द्रविड, विषाणू आजारतज्ज्ञ व जनरल फिजिशियनयंदा सातत्याने शहरात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे आर्द्रता 80 ते 90 टक्क्यांवर भर उन्हाळ्यात जात आहे. एरवी ती सुमारे 50 ते 55 टक्के असते. तसेच शहरात राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटातून यंदा सतत उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे हीट डिस्कंफर्ट वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना आम्ही वारंवार सुती कपडे घाला, काम नसेल तर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत उन्हात फिरणे टाळा असा सल्ला देत आहोत.-अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा
हेही वाचा