बारामती लोकसभा निवडणुकीवर संभाजी ब्रिगेडचा बहिष्कार; ‘हे’ आहे कारण | पुढारी

बारामती लोकसभा निवडणुकीवर संभाजी ब्रिगेडचा बहिष्कार; 'हे' आहे कारण

जळोची : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी (दि. 17) संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा सचिव विनोद जगताप यांच्या
प्रमुख उपस्थितीत बारामती येथे पार पडली.

या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीतर्फे अभिमन्यू पवार व मनोजकुमार गायकवाड यांनी स्थानिक पातळीवरील मित्रपक्षांबाबतची नाराजी, संभ्रम दूर करून समन्वय साधण्यासाठी मार्गदर्शन करून प्रयत्न केले. त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतभेद विसरून संपूर्ण ताकदीने कार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीनंतर बारामती स्थानिक पातळीवरील पदाधिकारी यांची पुनश्च बैठक पार पडली. यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी सोडवलेला नाही, या मुद्द्यावरून नाराजीचा सुर कार्यकर्त्यांनी आळवला.

हेही वाचा

Back to top button