धक्कादायक ! पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय : गुन्हे शाखेचा छापा | पुढारी

धक्कादायक ! पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय : गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पुणे- सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लरचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रिना बेल डॅनियल (वय 36, रा. गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सातारा रस्त्यावर बालाजीनगर परिसरात एका इमारतीत दिशा आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव आणि पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने दोन महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रिना डॅनियलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाच

Back to top button