..आणि शंभर वर्षांपूर्वीचा वृक्ष कोसळला; रेल्वे स्टेशन परिसरात अनर्थ टळला | पुढारी

..आणि शंभर वर्षांपूर्वीचा वृक्ष कोसळला; रेल्वे स्टेशन परिसरात अनर्थ टळला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांची येथे गर्दी कमीच होती. त्यामुळे येथे कोणताही प्रवासी जखमी झाला नाही, सुदैवाने मोठी घटना टळली. याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6.30 च्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या दर्ग्याशेजारील जुने झाड (अंदाजे 100 वर्षांपूर्वीचे) पडले. त्यात महत्त्वाचे म्हणजे सकाळची वेळ असल्याने त्या वेळी येथून प्रवाशांची ये-जा सुरू नव्हती. त्यामुळे कोणताही प्रवासी या वेळी जखमी झाला नाही. त्यानंतर संबंधित विभागाच्या मदतीने येथील झाड पडलेल्या फांद्या, पाने, मूळ हटवून प्रवाशांना व्यवस्थितरीत्या ये-जा करण्यासाठी जागा मोकळी करून देण्यात आली.

स्थानकाची इमारतदेखील जुनीच

पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीसह परिसरात अनेक ठिकाणी जुनी झाडे आहेत. प्रवाशांना येथून ये-जा करताना ती पाहायला मिळत असतात. इंग्रजांच्या काळात इंग्रज अधिकारी आणि वास्तुविशारद असलेल्या जेम्स बरकली यांनी रेल्वे स्थानकाची वास्तू उभारली. तीदेखील खूप जुनी झाली आहे. त्यामुळे या वास्तूचासुध्दा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. तसे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यातसुध्दा आले आहे.

हेही वाचा

Back to top button