यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन | पुढारी

यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील प्रगतशील शेतकरी आकाश हनुमंतराव चाचर व कुलदीप हनुमंतराव चाचर यांनी को-86032 या उसाचे चालू गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उसाची उंची साधारण 16 ते 17 फूट आहे व उसातील कांड्यांची संख्या 32 ते 34 आहे. यामध्ये एकरी 85 ते 90 टन उत्पादन मिळाले आहे. या उसाच्या उत्पादनासाठी जमिनीची योग्य मशागत, शेणखताचा वापर, आवश्यक खते आणि औषधांच्या फवारण्या, पाण्याची उपलब्धता तसेच योग्य नियोजन आणि देखभालीमुळे उसाची उत्पादकता वाढल्याचे प्रगतशील शेतकरी आकाश चाचर व कुलदीप चाचर यांनी सांगितले.

या उसाच्या उत्पादनासाठी जयश्री चाचर तसेच श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर्यन यादव, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, अ‍ॅग्रीहोश्चर उज्ज्वल पवार, चीटबॉय आनंदा पाटोळे, संदीप मोटे, कृषी सहायक स्नेहल जाधव यांनी मार्गदर्शन केल्याचे शेतकरी आकाश चाचर यांनी सांगितले. उसाच्या विक्रमी उत्पादनाबद्दल परिसरातील शेतकर्‍यांकडून चाचर कुटुंबीयांचे अभिनदंन होत आहे. या वेळी शेतात भाऊसो गायकवाड, दिलीपअण्णा भामे, महेंद्र भामे, विकास चाचर, कुलदीप चाचर, बाळासो उसरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button