Loksabha election | निवडणुका अखेरच्या टप्प्यात येऊ द्या : मनोज जरांगे

Loksabha election | निवडणुका अखेरच्या टप्प्यात येऊ द्या : मनोज जरांगे
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या कोणत्याही प्रकारचे राजकीय वक्तव्य करणार नाही. आज केवळ दौरा असून, पुण्यात पुन्हा एकदा 21 एप्रिलला येणार आहे. त्या वेळी नक्कीच भूमिका मांडणार आहे. मात्र, लोकसभा , त्या वेळी समाजाला काय संदेश द्यायचा तो देईन, असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केले. लालमहाल येथे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, हनुमंत मोटे, किशोर मोरे, अनिकेत देशमाने, सचिन बहिरट, अजित जाधव, शशी पवार, अमोल मांढरे, वैजनाथ मोखणे, विकास डोख, विजय बराटे यांसह मान्यवर उपस्थित होते.
मनोज जरांगे हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडला दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. बाणेर येथे उभारण्यात आलेल्या मराठा सहायक समिती कार्यालयाचे उद्घाटन करून पुण्याचा दौरा सुरू केला. पुण्यातून आळंदी येथे मुक्कामाच्या ठिकाणी जाताना त्यांनी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून दर्शन घेतले. त्यानंतर डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौर्‍याचा समारोप लालमहाल येथे केला.
'तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय', ' एक मराठा, लाख मराठा,' 'लढेंगे और जितेंगे… हम सब जरांगे' या व अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लालमहालचा परिसर दणाणून सोडला. डेक्कन जिमखाना येथे वंचित विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी जरांगे पाटील यांचे भेट घेतली. या वेळी जरांगे   यांनी समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते आळंदीच्या दिशेने रवाना झाले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news