दिघीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड | पुढारी

दिघीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ वादातून 14 जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करीत घरांवर दगडफेक केली. तसेच, कबुतरखान्यासही आग लावून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास साई पार्क, दिघी परिसरात घडली.

दोन डोस घेतलेल्यांनाच कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती

रूषीकेश नवनाथ वाळके (22, रा. आझाद हिंद मित्र मंडळाजवळ, साईपार्क, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अर्जुनसिंग, संग्रामसिंग बाधा, अभिजित घोरपडे, सुरजितसिंग बाधा, करणसिंग, सोन्या, गजलसिंग बाधा, हुकूमसिंग बाधा, अजयसिंग टाक, महिला आरोपी आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

विरोधकांच्या टोळीशी हातमिळवणी, नागपुरात कुख्यात गुंडाकडून मेकॅनिकची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी वाळके हे आपल्या घरात होते. त्यावेळी त्यांना आरडा-ओरडा आणि तोडफोडीचा आवाज आला.ते घराबाहेर आले असता अर्जुनसिंग, अभिजित घोरपडे, संग्रामसिंग यांनी फिर्यादी वाळके यांच्या हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार करून खूनी हल्ला केला.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होणार भिकारीमुक्त

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर इतर आरोपींनी याच परिसरात राहणार्‍या दिगंबर घनश्याम पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला. तसेच आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये विशाल तात्या मासाळ हे गंभीर जखमी झाले.

त्यानंतर हातातील कोयता, तलवार आणि दगडाने परिसरातील सहा दुचाकी, दोन टेम्पो, दोन मोटारी, दोन मिनीबस एक रिक्षा आणि एक बस अशा एकूण 14 वाहनांची तोडफोड केली. तसेच, या परिसरात असलेल्या कबुतर खान्यालाही आरोपींनी आग लावून दिली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button