शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : घरातील एखादा मुलगा घराच्या विरोधात जाऊन वेगळा निर्णय घेतो व लव्ह मॅरेज करून मुलीला घरात आणतो, तेव्हा घरातील इतर सदस्यांची नाराजी स्वाभाविक आहे. तसेच सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित करताना इतर पक्षातील नाराज लोकांची भावना आहे. सूनबाई काही दिवसांत आपल्या स्वभावाने घरातील सर्वांची मने जिंकून लाडाची होते. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आपला स्वभाव व कामाने सर्वांची मने जिंकून प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वयक बैठक सोमवारी (दि.1) रोजी चाकण येथे पार पडली, त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या बैठकीत मंत्री उदय सामंत व चंद्रकांत पाटील यांनी खासदारकीची निवडणूक देशपातळीवर लढवली जात असून, गावकी-भावकीचे मुद्दे, हेवे-दावे, रुसवे- फुगवे बाजूला ठेवा, असे सांगितले.
हेही वाचा