Leopard News : ‘त्या’ बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला ! | पुढारी

Leopard News : ‘त्या’ बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला !

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील इमारतीमध्ये मंगळवारी (दि. 26) रात्री 9 वाजता घुसलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीमवरच त्याने हल्ला केला. या हल्ल्यात आळे वनपरिक्षेत्राचे वनरक्षक जखमी झाले. जवळपास इमारतीत सव्वा तास हा थरार सुरू होता. कैलास भालेराव असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. बिबट्याला इमारतीमधून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दुसर्‍या बाजूने इमारतीवर चढून त्यांनी बिबट्यास खाली हुसकाविले. बिबट्या जिन्याने खाली येत असल्याचे दिसताच रेस्क्यू टीम सदस्यांनी पत्र्यावर उड्या मारल्या. त्या वेळी जिन्याने बाहेर पडण्याऐवजी बिबट्याने पत्र्यावरच झेप घेतली आणि वनरक्षक कैलास भालेराव यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पत्र्यावरून पुढे झेप घेत बाजूच्या शेतात त्याने पळ काढला.

जखमी झालेले वनरक्षक कैलास भालेराव यांच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

– वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

हेही वाचा

Back to top button