पोलिसांना होतेय ‘सीईआयआर’ची मदत; काय आहे सीईआयआर?

पोलिसांना होतेय ‘सीईआयआर’ची मदत; काय आहे सीईआयआर?
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर म्हणजेच 'सीईआयआर' या पोर्टलची पोलिसांना चांगली मदत होऊ लागली आहे. या पोर्टलच्या मदतीने पिंपरी पोलिसांनी मागील दोन महिन्यात हरवलेल्या 50 मोबाईलचा शोध लावला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक नवे वेब पोर्टल सुरू केले आहे. सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर म्हणजेच 'सीईआयआर' असे या पोर्टलचे नाव आहे. चोरीला किंवा हरवलेल्या मोबाईलचा 'आयएमईआय' क्रमांक या वेबसाईटवर रजिस्टर केला जातो. त्याद्वारे मोबाईल डिव्हाईस तातडीने ब्लॉक करता येतो; तसेच देशातील सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांना याची माहिती पाठवली जाते. या वेबसाईटमुळे पोलिसांना मोबाईल ट्रॅक करणे सोपे झाले आहे.

चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये दुसरे सीमकार्ड टाकल्यास याची माहिती तक्रार केलेल्या पोलिस ठाण्याला प्राप्त होते.
या वेबसाईटच्या मदतीने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 'सीईआयआर' या पोर्टलच्या माध्यमातून परराज्यातून 15 आणि राज्यभरातून 35 मोबाईल फोन हस्तगत करण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. बिहार, कर्नाटक, मालदा पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र येथून हे मोबाईल फोन जप्त केले आहेत. पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार शहाजी धायगुडे आणि दत्तात्रय निकम यांनी मागील वर्षभरात तब्बल 250 पेक्षा अधिक मोबाईल जप्त
केले होते.

365 जणांचा लावला शोध

पोलिस अंमलदार शहाजी धायगुडे आणि दत्तात्रय निकम धायगुडे यांनी बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यातही चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 212 बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. मंगलोर, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून या नागरिकांचा शोध घेण्यात आला आहे. सन 2022/23 या वर्षांत निकम आणि धायगुडे यांनी 365 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला. तसेच, वर्षभरात गहाळ झालेले 300 मोबाईल त्यांनी हस्तगत केल्याची नोंद आहे. या कामगिरीची दखल घेत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोघांचा सत्कार केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news