दुर्दैवी ! भरधाव कारच्या धडकेत तरुण जागीच ठार; फरार चालकास पोलिसांनी पकडले

दुर्दैवी ! भरधाव कारच्या धडकेत तरुण जागीच ठार; फरार चालकास पोलिसांनी पकडले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-नगर महामार्गांवरील खामुंडी गावच्या हद्दीतील उंब्रज चौकात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास भरधाव कारने ठोकर मारून कार चालकाने कारसह पलायन केले होते. ही माहिती ओतूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारचालकाचा शोध घेत त्यास पकडले. गणेश उर्फ भावड्या चंद्रकांत तुळवे (वय ३६, रा. खामुंडी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत तुळवे हा रस्ता ओलांडत असताना ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच १४ एलए ८१५३) हिची जोरदार धडक बसल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी कारचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे, पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, सखाराम जुम्बड हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. अपघात करणाऱ्या कारचा शोध लावण्यात त्यांना काही तासात यश आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news