

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून लुटणाऱ्या महिलांना नारायणगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. याबाबत माहिती देताना शेलार यांनी सांगितले की, दि. १२ मार्च रोजी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास नारायणगावच्या बँक ऑफ इंडिया येथे नंदाराम उमाजी गाढवे (वय ६७) यांनी त्यांना मोटरसायकल घ्यायची असल्याने त्यांनी बँक ऑफ इंडिया येथून ५० हजार रुपये रोख काढून पँटचे खिशात ठेवली. यावेळी अज्ञाताने हातचलाखीने त्यांचे त्यांच्या खिशातील ५० हजार रुपयाची रक्कम चोरी केली. याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फूटेज चेक करून दोन संशईत महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांची नावे सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय ३५, रा. गुलखेडी, ता. पाचोर, जि. राजगड, रा. मध्यप्रदेश) आणि उपासना डॅनी भानेरिया (वय २०, रा. कडिया, ता. पाचोर, जि. राजगड, रा. मध्यप्रदेश) अशी असून त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडून चोरीला गेलेले ५० हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जुन्नरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेसमोर त्यांना हजर केले असता त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार रमेश काठे करीत आहेत.
हेही वाचा