पुणे : इंदापूरमध्ये गोळीबार करत कोयत्याने वार करून युवकाचा खून | पुढारी

पुणे : इंदापूरमध्ये गोळीबार करत कोयत्याने वार करून युवकाचा खून

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गांच्या इंदापूर येथील बाह्यवळणावरील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबलेल्या युवकाचा पाठीमागून आलेल्या गाडीतील युवकांनी गोळीबार करीत कोयत्याने वार करत खून केला. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री घडली. यामध्ये एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून झालेल्या युवकाचे नाव अविनाश बाळु धनवे (रा. वडमुखवाडी आळंदी, ता. हवेली) असल्याची प्राथमिक माहीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान इंदापूर शहरानजिकच्या बाह्यवळणावरील एका हॉटेलमध्ये एका चारचाकी गाडीने हवेली तालुक्यातील चौघे व्यक्ती (नावे माहित नाही) जेवणासाठी आले होते. ते हॉटेलमध्ये जाऊन बसले असतानाच पाठीमागून दुसऱ्या चारचाकीत गाडीत आलेल्या अंदाजे ५ ते ६ अज्ञात व्यक्तींनी यातील अविनाश धनवे याच्यावर गोळीबार करीत त्याच्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून तपासाला सुरूवात केली आहे.

Back to top button