Vasant More : वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण | पुढारी

Vasant More : वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : वसंत मोरे (Vasant More) यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेचा राजीनामा दिल्याने पुण्यात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. मनसेच्या परतीचे दोर कापल्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याची चर्चा रंगली आहे. अशातच आज एक मोठी बातमी समोर आली आहे. आज वसंत मोरे यांनी पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर आता ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मनसेच्या राजीनाम्याचा निर्णय हा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर ते कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहीली आहे. आज पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयात भेट देऊन त्यांनी त्यांची आगामी दिशा स्पष्ट केली आहे का अशी शंका उपस्थित होत आहे. (Vasant More)

लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी भाजप सह काँग्रेसने आपले काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

हेही वाचा

Back to top button