व्यसने सुटतात; फक्त संयम बाळगा!

व्यसने सुटतात; फक्त संयम बाळगा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यसन माणसाकडे जात नाही, तर माणूस व्यसनाकडे वळतो. बरेचदा इच्छा असूनही व्यसन सोडता येत नाही. अशा वेळी समुपदेशन, औषधोपचार या मार्गाने व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये रुग्णांना व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्यास मदत केली जाते. व्यसने सुटतात; फक्त संयम बाळगा, असा विश्वास व्यसनमुक्ती केंद्रे, स्वयंसेवी संस्था निर्माण करण्यासाठी झटत आहेत. तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी गंमत म्हणून, कधी मित्रांचा आग्रह म्हणून, तर कधी काहीतरी वेगळे करून पाहण्याच्या उद्देशाने तरुणाई व्यसनांकडे वळते.

कालांतराने व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक परिणाम जाणवू लागतात. यातून वेळीच बाहेर पडण्यासाठी कधी रुग्ण स्वत:हून स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेतात, तर कधी कुटुंबीय घेऊन जातात. अशा वेळी 'तू कसा चुकतो आहेस' हे सांगण्यापेक्षा 'तू यातून नक्की बाहेर पडशील' असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला जातो. व्यसनमुक्ती केंद्रांशी संपर्क साधून 'पुढारी'च्या प्रतिनिधीने सध्या तरुणांमध्ये कोणत्या प्रकारची व्यसने आढळून येतात, त्यांना बाहेर पडण्यासाठी कशी मदत केली जाते, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी ससून रुग्णालयाचे व्यसनमुक्ती केंद्र, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्याशी संपर्क साधला.

संपर्क तोडला अन् त्रास कमी झाला

ससून रुग्णालयात आसामचा एक 22 वर्षांचा रुग्ण बहिणीसोबत आला होता. त्याला तीन- चार वर्षांपासून ब्राऊन शुगरचे व्यसन जडले होते. कामानिमित्त पुण्यात आल्याने त्याला सहजासहजी ब्राऊन शुगर मिळत नव्हती आणि त्यामुळे मानसिक, शारीरिक त्रास होत होता. त्याच्यावर लक्षणांनुसार उपचार करण्यात आले. आता त्याचे व्यसन सुटले असून, तो आता एकटा दर महिन्याला फॉलोअपसाठी येतो.  ब्राऊन शुगर उपलब्ध करून देणाऱ्या लोकांशी त्याने संपर्क तोडला आहे आणि त्याचा त्रासही कमी झाला आहे. समुपदेशनाला औषधोपचारांची जोड मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये 28 वर्षांचा मुलगा उपचारांसाठी घरच्यांबरोबर आला. त्याला मॅफेड्रॉनसह दारूचेही व्यसन होते. पाच-सहा वर्षांपासून तो व्यसनांच्या विळख्यात अडकला होता. त्याच्याशी संवाद साधला, त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. समुपदेशनाला औषधोपचारांची जोड देण्यात आली. सातत्याने संपर्कात राहून व्यसनांपासून दूर जाण्यासाठी परावृत्त करण्यात आले. आता तरुण व्यसनमुक्त झाला असून, नियमितपणे फॉलोअपसाठी येतो.

एखाद्या व्यक्तीला व्यसनातून बाहेर पडायचे असल्यास त्याला ओपीडीमध्ये बोलावले जाते. पुण्याबाहेरील असल्यास जवळच्या फॉलोअप सेंटरला पाठवले जाते. केसचे विश्लेषण करून उपचारांची दिशा ठरवली जाते. गरज असल्यास अ‍ॅडमिट करून घेतले जाते. दैनंदिन वेळापत्रक आखून त्यात औषधोपचार, समुपदेशन, ग्रुप थेरपी, छंद जोपासण्याचा प्रयत्न यांचा समावेश केला जातो. औषधांनी विड्रॉअल सिम्पटम्प कमी होतात आणि हळूहळू तो बाहेर पडू लागतो. बरेचदा व्यसन एकदा सुटल्यावर परत लागण्याची शक्यता असते. अशा वेळी उपचार कायम ठेवले जातात.

– मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

ससूनच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 2 वर्षांमध्ये 2500 ते 3000 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. दारू, तंबाखू, गांजा, चरस, ब—ाऊन शुगर, टर्मिन इंजेक्शन अशी विविध व्यसने असलेले रुग्ण उपचारांसाठी येतात. व्यसनांची तीव—ता, त्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या याबाबत रुग्णाशी आणि नातेवाइकांशी चर्चा केली जाते. समुपदेशनाचा खूप उपयोग होतो. याचबरोबर पुन्हा व्यसनांची इच्छा होऊ नये म्हणून औषधे, मोटिव्हेशनल एनहान्सर थेरपी असे उपचार दिले जातात. व्यसनांची तीव—ता जास्त असल्यास अ‍ॅडमिट करून घेतले जाते.

– डॉ. निशिकांत थोरात, व्यसनमुक्ती केंद्र प्रमुख, ससून रुग्णालय.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news