सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा : आ. राहुल कुल यांची मागणी

सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा : आ. राहुल कुल यांची मागणी

खोर : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर उपसा सिंचन योजनेतील दौंड तालुक्यातील खुपटेवाडी फाटा येथील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे व जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे फेरसर्वेक्षण करून या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

दौंड तालुक्याशी संबंधित जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या वेळी आ. कुल यांनी विविध मागण्या केल्या. जलसंपदा सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, उपसचिव संजय टाटू आदी उपस्थित होते.

बंधार्‍यांच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालींच्या सुधारणेसाठी एशियन बँकेच्या सहकार्याने होणार्‍या प्रकल्प अहवालाची कार्यवाही करावी. दौंड तालुक्यातील जीर्ण कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांच्या व्यवस्थेत बदल करावा. या बंधार्‍यांच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच नवीन बंधारे
सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने दुरुस्ती व बांधकाम करावे. मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळविण्याबाबत समितीचा अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णयप्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी आ. कुल यांनी बैठकीत केली.

बंद नळी कालव्याच्या प्रस्तावाला मान्यता द्या

आ. कुल यांनी खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. 43 (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर) ते कि. मी. 109 (भागवतवस्ती पाटस) एकूण 67 कि. मी. लांबीचे अस्तरीकरण व मजबुतीकरणासाठी 188.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणी काळभोरपर्यंत बंद नळी कालव्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करून त्यास तातडीने मान्यता द्यावी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news