Baramati Namo Maharojgar Melava | बारामती : अजितदादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे | पुढारी

Baramati Namo Maharojgar Melava | बारामती : अजितदादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे

बारामती : बारामतीत नमो रोजगार मेळावा सुरू आहे. बारामतीला नंबर वन बनविण्याचं अजित दादांचं स्वप्न आहे. अजितदादांकडे तिजोरीची चावी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शनिवारी नमो रोजगार मेळाव्यात संबोधित करताना म्हटले. येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले की आपलं सरकार आलं आणि 75 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या गेल्या. पोलीस भरती सुरु आहे. त्यात आता त्यात आरक्षणाचा लाभही घेता येईल. कौशल्य विकासासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आपण अनेक कार्यक्रम आयोजित करत आहोत. राज्यात विविध भागात रोजगार मेळावे भरविले जाणार आहेत. आपल्या सरकारचा ‘शासन आपल्या दारी’द्वारे सुद्धा जनतेपर्यंत कौशल्य रोजगार पुरवत आहोत. शेतकरी, बचत गट यांच्यासाठी आवश्यक वस्तू देण्याचं काम एका छताखाली आणण्याचा काम सुद्धा आम्ही करत आहोत.

आमचं पहिलं सरकार आहे. ज्यांनी युवकांना नियुक्त्या दिल्या. हे मी अभिमानाने सांगतो. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर…

एकूणच बारामतीमधील नमो महारोजगार मेळावा अनेक अंगांनी चर्चेत आहे. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरील कार्यक्रमात प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर आलेले दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, सुनेत्रा पवार सगळे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

हेही वाचा

Back to top button