विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ‘एमआयडीसी’चाही हक्क : संस्थेच्या विश्वस्तांकडून दावा

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ‘एमआयडीसी’चाही हक्क : संस्थेच्या विश्वस्तांकडून दावा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : खासदार शरद पवार अध्यक्ष आणि मी विश्वस्त असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शनिवारी (दि. 2) नमो महारोजगार मेळावा होत असला, तरी आम्हा दोघांनाही या मेळाव्याचे निमंत्रण नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असला, तरी या मैदानावर विद्या प्रतिष्ठान एवढाच एमआयडीसीचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या बैठकीत या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या बैठकीला 7 विश्वस्त उपस्थित होते. मुळात हे मैदान एमआयडीसीने विद्या प्रतिष्ठानला काही नियम व अटींच्या अधिन राहून दिलेले आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानशिवाय एमआयडीसीसुद्धा त्या मैदानाचा वापर करू शकते, असे या संस्थेच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आल्याने आमच्या संस्थेच्या मैदानावर मेळावा होत आहे, यामुळे खासदार सुळे यांच्या वक्तव्यातील हवाच गेली आहे.

शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार हे विश्वस्त असून, अ‍ॅड. ए. व्ही. प्रभुणे, बाळासाहेब तावरे, अ‍ॅड. नीलिमा गुजर, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, विठ्ठल मणीयार हे कुटुंबाबाहेरचे सदस्य या संस्थेचे विश्वस्त आहेत. पक्ष फुटीनंतर पवार कुटुंबात कटूता निर्माण झालेली असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौर्‍यावर आल्यानंतर विद्या प्रतिष्ठानमध्येच त्यांचा जनता दरबार भरवतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी कोणी दिली हे माहीत नसल्याचे बारामतीत गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पण बुधवारी मात्र त्यांनी शरद पवार यांनी उभ्या केलेल्या संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद असल्याचेही सांगितले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news