पुरंदर उपसा तत्काळ सुरू करा : राहुल नार्वेकर यांची सूचना | पुढारी

पुरंदर उपसा तत्काळ सुरू करा : राहुल नार्वेकर यांची सूचना

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर पाणी उपसा योजना सोमवारच्या (दि. 26) आधी कार्यान्वित करावी व तत्काळ अहवाल शासनाला पाठवा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर यांना दिल्या आहेत. नार्वेकर यांना दुष्काळसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी निवेदन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप यांनी दिले. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांकडून लोकसभा, विधानसभा निवडणुका संदर्भात पुरंदर तालुक्याचाआढावा घेतला.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, भाजपाचे प्रदेश निमंत्रक अ‍ॅड. श्रीकांत ताम्हाणे, सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, शिवसेनेचे शिंदे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. नितीन कुंजीर, माजी नगरसेवक सचिन भोंगळे, युवासेना कार्याध्यक्ष मंगेश भिंताडे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अविनाश बडदे आदी उपस्थित होते. पुरंदर उपसा जलसिंचन योजना तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरली आहे.

जे मतदान करतील त्यांनाच पाणी दिले जाते, तर इतरांना पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नाही. पैसे भरण्यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली असताना ठेकेदार रोख रक्कम मागत असून, रकमेची पावती दिली जात नाही. संबंधित अधिकारी नीलेश लगड यांच्याकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याने तत्काळ बदली करण्याची मागणी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप यांनी केली. या वेळी अमोल जगताप, संदीप देवकर, बाळासाहेब काळाणे, प्रतीक म्हेत्रे, अभिजित जगताप, श्रेयस जगताप, ओमकार जगताप, अरबाज अत्तार, संतोष बापू जगताप, दीपक जावळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button