नवले पुलाजवळ डंपरची प्रवासी बसला धडक; सात जण जखमी | पुढारी

नवले पुलाजवळ डंपरची प्रवासी बसला धडक; सात जण जखमी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला. मुंबईकडून वेगाने निघालेल्या  दिली. अपघातात सात प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला. त्यामुळे नवले पुलावरील अपघाताची मालिका थांबताना दिसून येत नाही. नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीची बस प्रवाशांना घेऊन सकाळी सातच्या सुमारास कार्यालयाच्या आवारातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत होती. त्या वेळी मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरचालकाला बस दिसली नाही.

डंपरचालकाने बसला चुकविण्याचा प्रयत्न केला. भरधाव असलेल्या डंपरने बसच्या उजव्या बाजूला पाठीमागून धडक दिली. अपघातात बस आणि डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. बाह्यवळण मार्गावर दरी पूल ते नवले पुलादरम्यान तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर भरधाव वाहनचालकांचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहेत. बाह्यवळण मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. भरधाव वाहनांना वेसण घालण्यासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दरी पूल परिसरात वाहतूक पोलिसांनी चौकी सुरू केली आहे. अपघातप्रवण क्षेत्राची माहिती देण्यासाठी या परिसरात विविध भाषांंमध्ये फलकही लावण्यात आले आहेत. या प्रकरणी महेश प्रसप्पा पडेश्वर (वय 34 वर्षे रा. धारवाड कर्नाटक) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चालक झिंनु शिवनाथ मोहांतो (वय 35 वर्षे रा. रायगड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. अपघातात रजनी विश्वनाथ मठ (वय 36 रा भालकी. ता. भालकी जि. बीदर) अंजली धनराज रायफले (वय 19 रूम नंबर 27 रवळी कॅम्प जवळ सायन मुंबई), बालाजी माधवराव बिरादार (वय 52 रा फ्लॅट नंबर 505 फेस वन तळोजा नवी मुंबई), संगीता सुनील कुमार गुदगे (वय 40 रा फ्लॅट नंबर 1108), अमरा हार्मोनी (तळोजा फेज वन नवी मुंबई), शारदा अनिल रेड्डी (वय 70 रा राजोळा बसवकल्याण बिदर), आयान राज शेखर तुझा (वय 4 एमिरेट्स हिल्स सोमाटणे फाटा तळेगाव) , शिवकुमार बाबुराव कामांना (वय 38 वर्ष फ्लॅट नंबर 104) महालक्ष्मी कामोठे (पनवेल) अशी जखमी झालेल्यांची नावे

बेकायदा थांबे बंद करण्याची गरज

नवले पुलाजवळ कोल्हापूर आणि मुंबईकडे जाताना बस, ट्रक आणि छोटी-मोठी वाहने प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात. तिथे रिक्षांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही वाहने आणि प्रवासी रस्ता मोठ्या प्रमाणात व्यापून घेतात. काही वर्षांपूर्वी थांबलेल्या प्रवाशांच्या अंगावर भरधाव गाडी जाऊन अनेकांचा मृत्यूही झाला होता. मात्र, तरीही हे थांबे बंद झालेले नाहीत.

हेही वाचा

Back to top button