दहिसर गोळीबार घटना माणुसकीला काळिमा फासणारी : अजित पवार | पुढारी

दहिसर गोळीबार घटना माणुसकीला काळिमा फासणारी : अजित पवार

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने राज्याला एकच हादरा बसला आहे. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार हे प्रकरण ताजच असताना अशा प्रकारची दुसरी घटना समोर येतेय. दहिसर गोळीबार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे. ‘घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे, अशी घटना कुठल्याही देशात, राज्यात वा शहरात घडू नये. याबाबत नीट तपास होणं गरजेचं आहे.’ असं अजित पवार म्हटले आहे. अजित पवार सद्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विमानतळाची पाहणी करण्यासाठी आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा

Back to top button