New Collector of Pune : पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

New Collector of Pune : पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तर क्रिडा व युवक सेवा आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (New Collector of Pune)

डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध महत्वाच्यापदावर काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी क्रिडा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले, खेड प्रांतधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. 2009 च्या आयएएस बॅचे ते अधिकारी आहेत. पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये दिवसे यांचे योगदान मोठे राहिले आहे. मागील काही दिवसांच्यापासून पुण्याचे जिल्हाधिकारी कोण अशी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता दिवसे यांच्या बदलीने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आज पदभार स्विकारणार…

जिल्हाधिकारीपदाचा पदभार शुक्रवारी स्विकारणार असल्याची माहिती डॉ. सुहास दिवसे यांनी 'पुढारी' बरोबर बोलताना दिली. यापूर्वी पुणे जिल्ह्यात विविध प्रशासकीयपदावर काम केले असल्यामुळे येथील प्रश्न माहिती आहे. ते प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त देशमुखांची एकही सुट्टी नाही

साडेतीनवर्षामध्ये एकही सुट्टी न घेण्याचा विक्रम लोकाभिमुख जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली नाही. देशमुख यांच्या सुरुवातीच्या दीडवर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोनाची लाट होती. यावेळी त्यांनी केलेल्या कामांची दखल देशपातळीवर घेण्यात आली. साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये देशपातळीवरील आणि राज्यपातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. पीएमआरडीए मेट्रोच्या जागेचा प्रश्न, चांदणी चौक, रिंगरोड, नाशिक पुणे रेल्वभूसंपादन, पालखीमार्ग, जेजुरी विकास आराखडा आदी कामांना पुढे नेण्यात देशमुख यशस्वी ठरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news