शहरात सोमवारी मटण, चिकन विक्री राहणार बंद | पुढारी

शहरात सोमवारी मटण, चिकन विक्री राहणार बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदू खाटीक मटण व्यावसायिक सोमवारी (दि. 22) सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाईवाटप करून या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदू खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी शनिवारी दिली. याखेरीज चिकन विक्रीही बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुणे डिस्ट्रिक्ट बॉयलर ट्रेडर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.

अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. आपले सर्व मटण विक्री व्यवहार बंद करून या पवित्र कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र हिंदू खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली. तर, पुणे डिस्ट्रिक्ट बॉयलर ट्रेडर असोसिएशनची नुकतीच कॉन्फरन्स कॉल बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सोमवारी (दि.22) चिकन विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसे सर्व विक्रेत्यांना आवाहन करण्यात आल्याचे असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button