मोटारसायकल चोरट्यांची टोळी अखेर जेरबंद : यवत पोलिसांची कारवाई | पुढारी

मोटारसायकल चोरट्यांची टोळी अखेर जेरबंद : यवत पोलिसांची कारवाई

यवत : पुढारी वृत्तसेवा : यवत, लोणी काळभोर, बारामती आणि हडपसर भागात मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आल्याची माहिती यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना शेडगे यांनी सांगितले की, दि. 15 जून 2023 रोजी पाटस (ता. दौंड) गावचे हद्दीत कोळपेवस्ती येथून गणेश मल्हारी गडदरे याची हॅन्डल लॉक करून लावलेली पल्सर मोटारसायकल अज्ञाताने चोरली होती. याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान यवत पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तपास करत संशयित कृष्णा रामभाऊ लोंढे, वय 23, रा. रासकर आळी, नानगाव, ता. दौंड, राहुल ऊर्फ कोयत्या हिंम्मत पवार, वय 21, रा. नानगाव, ता. दौंड यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली.

त्यांनी कृष्णा रामभाऊ लोंढे तसेच राहुल ऊर्फ कोयत्या हिंम्मत पवार, वय 21, रा. नानगाव, ता. दौंड, यश ऊर्फ पंडित ज्ञानेश्वर थोरात, रा. नानगाव, ता. दौंड यांच्या मदतीने यवत, दौंड, लोणी काळभोर, हडपसर आणि बारामती शहर इत्यादी पोलिस ठाणे हद्दीतून 10 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलिस हवालदार नीलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, पोलिस नाईक हनुमंत भगत, पोलिस जवान समीर भालेराव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

 

Back to top button