तालुक्याचा विकास हेच एक ध्येय : आमदार अशोक पवार | पुढारी

तालुक्याचा विकास हेच एक ध्येय : आमदार अशोक पवार

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सत्ता कोणाचीही असो, तालुक्याचा विकास हेच एक ध्येय मनाशी बाळगलेले आहे. त्यानुसार निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले. रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी पवार बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सरपंच प्रदिपा रणदिवे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष रणदिवे, संचालक उत्तम सोनवणे, कात्रज दूध संघाचे संचालक निखिल तांबे, उपसरपंच नवनाथ राक्षे, शरदराव निंबाळकर, संभाजी लोखंडे, निखिल तांबे, बाळासाहेब रणदिवे, उत्तम लोखंडे, अमोल काळभोर आदी यावेळी उपस्थित होते. आमदार पवार म्हणाले, विधानसभा किंवा लोकसभेचा निधी असो पाठपुरावा करणे हे गरजेचे असते. केंद्रामध्ये सत्ता नसली म्हणजे निधी मिळत नाही, असे विरोधक सातत्याने सांगत असतात पण शेवटी पाठपुरावा महत्त्वाचा आहे.

आमदार होण्यापूर्वी शिरूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची, पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होती, त्यामुळे प्रथम रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर महत्त्वाच्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकाची कसरत थांबावी म्हणून शक्य होईल तेवढा निधी दिला. नदीकाठच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आरओ फिल्टरच्या माध्यमातून योजना राबवली. विकासकामे करत असताना कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button