महत्वाची बातमी : पुण्यातून उत्तरेकडे जाणार्‍या या रेल्वेगाड्या रद्द | पुढारी

महत्वाची बातमी : पुण्यातून उत्तरेकडे जाणार्‍या या रेल्वेगाड्या रद्द

पुणे : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल- मथुरा जंक्शनमध्ये यार्ड रीमॉडलिंग कामाकरिता आणि नॉन- इंटरलॉकिंग कामामुळे पुणे विभागातील काही गाड्या रद्द केल्या आहेत. दि.10 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत पुणे- जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, तर दि. 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस रद्द केली आहे. तर पुणे हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा

Back to top button