चिंताजनक ! शहराची हवा पुन्हा धोक्याच्या पातळीवर | पुढारी

चिंताजनक ! शहराची हवा पुन्हा धोक्याच्या पातळीवर

 

आशिष देशमुख

पुणे : गेले काही दिवस शहराची हवा चांगली होती. मात्र, हवामान बदलताच हवेची गुणवत्ता पुन्हा खराब गटांत गेली आहे. शिवाजीनगर अतिप्रदूषित गटात गेल्याने त्या भागाला रेड अलर्ट दिला आहे. तर पिंपरी, निगडी, वाकड, आळंदी, लोहगावची पुन्हा आजारी लोकांसाठी धोकादायक बनली आहे.

दिवाळीत अतिप्रदूषित गटांत आलेली शहराच्या हवेची गुणवत्ता गेले पंधरा ते वीस दिवस मध्यम ते शुध्द गटांत होती. मात्र, 25 डिसेंबरपासून शहर प्रदूषित गटांत गेले आहे. शहरात रस्त्यावरील वाहनांची वाढती गर्दी अन् बदललेले वातावरण, यामुळे पुन्हा शहराची हवा धोक्याच्या पातळीवर आली आहे. मंगळवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व पुण्यातील सफर या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार शिवाजीनगरची हवा अतिप्रदूषित गटात गेल्याने तो भाग रेड झोनमध्ये दाखवला जात आहे.

हेही वाचा

Back to top button